शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत भंगारचे दुकान जळून खाक , २ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:22 IST2018-03-14T15:22:53+5:302018-03-14T15:22:53+5:30
महावितरणच्या जनित्रात शॉट सर्किट झाल्यामुळे वाल्हेकरवाडी येथील भंगारच्या दुकानाला भीषण आग लागली.

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत भंगारचे दुकान जळून खाक , २ लाखांचे नुकसान
रावेत : महावितरणच्या जनित्रात शॉट सर्किट झाल्यामुळे वाल्हेकरवाडी येथील भंगारच्या दुकानाला भीषण आग लागली. मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली, असे प्रत्यक्ष दर्शनीने सांगितले. या आगीत भंगारचे संपूर्ण दुकान जळून खाक झाले. भंगारात प्लास्टिकच्या वस्तुंची प्रमाण अधिक असल्याने आगीने जास्त पेट घेतल्याने संपूर्ण दुकान जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दीड ते दोन लाखांचे नुकसान या आगीत झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, वेळेत आग विझविल्याने या घटनास्थळापासून जवळ असणारी दोन दुकाने या आगी पासून वाचली आहे. आगीची माहिती समजताच ब प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे,शेखर चिंचवडे,सुरेश चिंचवडे,दिलीप चिंचवडे,सचिन शिवले आदींनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेची माहिती तत्काळ पालिका आणि प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला दिली. काही वेळात अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, प्लॅस्टिक व कागदी पुठ्ठे यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले.दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले.