पिंपरी चिंचवड : केमिकल कंपन्यांतील टाकाऊ साहित्याला लागली भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 10:31 AM2017-12-19T10:31:16+5:302017-12-19T10:34:47+5:30

पिंपरी नेहरू नगर परिसरातील मोकळ्या मैदानात काही केमिकल कंपनींतील टाकाऊ साहित्याला आग लागल्यानं परिसरात मोठ-मोठाले धुराचे लोट पसरले आहेत.

fire took place at Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवड : केमिकल कंपन्यांतील टाकाऊ साहित्याला लागली भीषण आग

पिंपरी चिंचवड : केमिकल कंपन्यांतील टाकाऊ साहित्याला लागली भीषण आग

Next

पिंपरी चिंचवड : पिंपरी नेहरू नगर परिसरातील मोकळ्या मैदानात काही केमिकल कंपनींतील टाकाऊ साहित्याला आग लागल्यानं परिसरात मोठ-मोठाले धुराचे लोट पसरले आहेत. टाकाऊ साहित्यामध्ये केमिकलमध्ये भिजलेला कापूस, फायबरचे तुकडे व अन्य साहित्याला मंगळवारी (19 डिसेंबर) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे.  आगीमुळे धुराचे मोठमोठे लोट पसरल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीमुळे परिसरात सर्वत्र काळा धूर पसरला आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. 
 

Web Title: fire took place at Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.