शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

वाढत्या कोरोना रुग्णांचा पोलीस दलालाही फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४०३ पोलिस 'वर्क फ्रॉम होम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 20:12 IST

वाढत्या कोरोना रुग्णांचा पोलीस दलालाही फटका; पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ४८ अधिकाऱ्यांसह ३५५ कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'

पिंपरी : कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पोलिसांच्या सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याअनुषंगाने ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिसांना ‘वर्क फ्राॅम होम’ देण्यात येणार आहे. या नवीन उपाययोजनांमुळे पोलीस बळावर मोठा परिणाम होणार आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहर दलातील तब्बल ४०३ पोलिसांना घरूनच काम करावे लागणार आहे. यामध्ये ४८ अधिकारी आणि ३५५ कर्मचारी घरूनच काम करणार आहेत. (work from to pimpri chinchwad police force above 55 age officer)

कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढल्याने दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे शासनाकडून कडक निर्बंध लागू केले जात आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागते. त्यामुळे पोलिसांचा आणि नागरिकांचा थेट संपर्क येतो. यातून पोलिसांना देखील संसर्गाची शक्यता आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार असलेल्या पोलिसांना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांना ‘वर्क फ्राॅम होम’ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे सध्या अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण ३२७५ इतके मनुष्यबळ आहे. त्यात ४०३ पोलीस ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यांना घरूनच काम करावे लागणार आहे. विविध गुन्ह्यांच्या तपासाची कागदपत्रे, अहवाल पूर्तता, आढावा आदी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ३५५ कर्मचाऱ्यांमध्ये ३०५ सहायक फौजदार (सहायक पोलीस उपनिरीक्षक) तर ५० हवालदार आहेत.

पोलिसांची होणार कसरत-

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत मनुष्यबळाची कमतरता आहे. असे असतानाच चारशेपेक्षा जास्त पोलिसांना घरातच थांबावे लागल्यास उर्वरित पोलिसांवर कामाचा ताण येऊ शकतो. त्यामुळे शहर पोलिसांची मोठी कसरत होणार आहे. 

शहर पोलीस दलातील मनुष्यबळ-

एकूण अधिकारी - ३४५एकूण कर्मचारी - २९३०५५ वर्षांवरील जास्त वय असलेले पोलीस अधिकारी - ४८कर्मचारी - ३५५

वरिष्ठ पातळीवरून सूचना येतील त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल. उच्च रक्तदाब, मधुमेह, डायलिसिस आदी आजार असलेल्या तसेच इतर आजारांवर उपचार सुरू असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. - पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस