थंड चहा दिल्याने पत्नीला मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 00:55 IST2018-11-15T00:54:19+5:302018-11-15T00:55:17+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता महेंद्र भालेराव (वय ३०, खंडेवस्ती) यांनी पतीविरोधात फिर्याद दिली आहे.

Due to cold tea, wife is beaten, shocking kind of wounds in Pune | थंड चहा दिल्याने पत्नीला मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार

थंड चहा दिल्याने पत्नीला मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पिंपरी : चहा थंड दिल्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी, भोसरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना खंडेवस्ती, भोसरी येथे मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता महेंद्र भालेराव (वय ३०, खंडेवस्ती) यांनी पतीविरोधात फिर्याद दिली आहे. महेंद्र भीमराव भालेराव (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. थंड चहा दिल्याच्या कारणावरून चिडून आरोपीने पत्नीला लोखंडी रॉडने मारले. तसेच ती घराबाहेर जात असताना, कठीण वस्तू फेकून मारून जखमी केले.
 

Web Title: Due to cold tea, wife is beaten, shocking kind of wounds in Pune