पिंपरी चिंचवड: होळीच्या दिवशी मद्यप्राशन करून गाडी चालवू नये असे आवाहन करूनही तरुण ऐकताना दिसून येत नाही. त्यामुळे अपघात घडून मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण दिले जात आहे. अशीच एक घटना पिंपरीत घडली आहे. कार चालकाचे त्याच्या कार वरील नियंत्रण सुटल्याने भर रस्त्यात कार पलटी होऊन कार चालक गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी मद्यधुंद कार चालकाचा त्याच्या कार वरील नियंत्रण सुटल्याने भर रस्त्यात कार पलटी झाली. या घटनेत कार चालक गंभीर जखमी झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी फाटा या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. मद्यधुंद कार चालक डांगे चौकाकडून पुण्याच्या दिशेने जात होता. सांगवी फाटा या ठिकाणी त्याचे कार वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सांगवी पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले असून कार चालकाला पुढील उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Web Summary : A drunk driver lost control and flipped his car in Pimpri Chinchwad on Holi. The driver was seriously injured. The accident occurred at Sangvi Phata as the driver headed from Dange Chowk towards Pune. Police are investigating; the driver is hospitalized.
Web Summary : पिंपरी चिंचवड में होली के दिन एक नशे में धुत चालक ने कार पर नियंत्रण खो दिया और कार पलट गई। चालक गंभीर रूप से घायल हो गया। दुर्घटना सांगवी फाटा पर हुई जब चालक डांगे चौक से पुणे की ओर जा रहा था। पुलिस जांच कर रही है; चालक अस्पताल में है।