शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पिंपरीत स्कूल बस तपासणीबाबत चालकांची अनास्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 16:48 IST

‘सुरक्षित विद्यार्थी वाहतूक’ करण्यासाठी वाहनांची तपासणी करावी.

ठळक मुद्दे२१३३ पैकी ९०० बसची तपासणी : आरटीओच्या आवाहनाकडे होतेय दुर्लक्ष५२७ खासगी शाळा, १०५ महापालिका शाळा , शिक्षण संस्था चालकांचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओ कार्यालयाकडून स्कूल बसची तपासणी करणे अनिवार्य

पिंपरी : स्कूल बसची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले होते.त्यानुसार, शहरात २१३३ स्कूलबस व व्हॅन असून त्यापैकी फक्त ९०० वाहनचालकांनी तपासणी पूर्ण केली आहे.‘सुरक्षित विद्यार्थी वाहतूक’ करण्यासाठी वाहनांची तपासणी करावी. वाहन शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार असणे आवश्यक आहे. आपल्या वाहनाचा विमा कर, परवाना आदी वैध कागदपत्रे जवळ बाळगावीत. त्याचप्रमाणे अग्निशामन यंत्र, मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला मदतनीसाची नेमणूक करणे अनिवार्य आहे. आपले वाहन या अटींची पूर्तता करत नसल्यास उपप्रादेशिक कार्यालयात आपल्या वाहनांची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले होते. उच्य न्यायालयाच्या आदेशानुसार दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओ कार्यालयाकडून स्कूल बसची तपासणी करणे अनिवार्य आहे. मात्र, शहरातील अनेक चालक-मालक वाहनांची तपासणी करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.  स्कूल बसचालकांनी आवाहनास केराची टोपली दाखवली आहे. शहरात ५२७ खासगी शाळा व १०५ महापालिकेच्या शाळा आहेत.  स्कूल बसचालक नियमांचे उल्लंघन करत प्रमाणापेक्षा जास्त मुलांची वाहतूक करताना दिसून येतात.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसची तपासणी करणे आवश्यक आहे. याबाबत चालकांना आवाहन केले आहे. कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या  चालकांनी लवकर वाहनांची तपासणी करून घ्यावी.- आनंद पाटील, अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड होते. त्यानुसार, शहरात २१३३ स्कूलबस व व्हॅन असून त्यापैकी फक्त ९०० वाहनचालकांनी तपासणी पूर्ण केली आह..............विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसची तपासणी करणे आवश्यक आहे. आमच्या संघटनेच्या बहुतांश चालकांनी तपासणी पूर्ण केली आहे. ज्यांच्या वाहनांची तपासणी झाली नसेल त्यांच्या वाहनांचा पासिंग काळ अजून संपला नसेल.- उदय दळवी, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळाStudentविद्यार्थी