राहटणीत वाहनचालकाचा खून,कारण अज्ञात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 14:06 IST2018-07-16T14:03:36+5:302018-07-16T14:06:16+5:30

राहटणी येथील शिवाजी चौकात टेम्पो चालकाचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल सुतार (वय 39,रा. चिंबली) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे.

Driver found murderd, the cause is unknown | राहटणीत वाहनचालकाचा खून,कारण अज्ञात 

राहटणीत वाहनचालकाचा खून,कारण अज्ञात 

पिंपरी : राहटणी येथील शिवाजी चौकात टेम्पो चालकाचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल सुतार (वय 39,रा. चिंबली) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. 

          खाजगी कंपनीला कामगार वाहतुकीसाठी लावण्यात आलेल्या टेम्पोवर अनिल वाहनचालक म्हणून काम करीत असे. 15 दिवसांपूर्वी या टेम्पोवर काम करणाऱ्या चालकाला टेम्पो चालकाने कामावरून कमी केले. त्याच्या जागी अनिल सुतार यास चालक म्हणून नेमले होते. सकाळी कामावर जाण्याची वेळ झाली तरी नियोजित वेळेत टेम्पो आला नाही, त्यामुळे कामगारांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविले. सुपेरवायझरने जीपीएस यंत्रणेद्वारे टेम्पोचे लोकेशन तपासले, चालक अनिल याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला मात्र त्यावेळी संपर्क होत नव्हता. जीपीएसद्वारे ज्या ठिकाणी टेम्पोचे लोकेशन दाखवले गेले, तेथे भेट दिली, तेव्हा चालक टेंम्पोतच पडला असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना याबाबत कळविण्यात आले, वाकड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली,तीक्ष्ण हत्याराने खून केला असल्याचे निदर्शनास आले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला. 

Web Title: Driver found murderd, the cause is unknown