Diwali 2022 : दिवाळीत पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूकीत बद्दल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 22:04 IST2022-10-18T21:59:40+5:302022-10-18T22:04:06+5:30
अवजड वाहने व सिटी बसचा मार्ग वळवण्यात आला...

Diwali 2022 : दिवाळीत पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूकीत बद्दल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
पिंपरी : पिंपरी बाजार पेठेत दिवाळी सणामुळे ग्राहकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने पिंपरी बाजारपेठेतून अवजड वाहने व सिटी बसचा मार्ग वळवण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तलयाच्या अंतर्गत वाहतूक विभागाने आदेश काढले आहेत. त्यानुसार ही वाहतूक मंगळवार (दि.१८) दुपारी एक वाजल्यापासून ते बुधवार (दि.२६) रात्री १२ वाजेपर्यंत वळवण्यात आली आहे.
बंद केलेले वाहतूक मार्ग व त्याला पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे
१) जयहिंद हायस्कुल डिलक्स चौक- कराची चौक-रिव्हर रोड- भाटनगर चौक पिंपरी पुल- मोरवाडी चौक- मुंबई-पुणे जुना हायवे हा मार्ग अवजड वाहने व सिटी बस यांचेकरीता वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. त्याला पर्यायी मार्ग जयहिंद हायस्कूल- डिलक्स चौक काळेवाडी- एमएम शाळेकडून उजवीकडे वळुन एम्पायर इस्टेट मदर टेरेसा पुल अँटी क्लस्टर मार्गे मोरवाडी चौक- मुंबई पुणे जुना हायवे वरुन पुढे
२) पिंपरी चौक गोकुळ हॉटेल- पिंपरी पुल शगुन चौक- कराची चौक- डिलक्स चौक- जय हिंद हायस्कुल पिंपरी गाव हा मार्ग अवजड वाहने व सिटी बस यांचेकरीता वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. > पर्यायी मार्ग पिंपरी चौक मोरवाडी चौक एम्पायर इस्टेट मद रटेरेसा फ्लायओव्हर एमएम चौकाकडून डावीकडे वळून काळेवाडी डिलक्स चौक जयहिंद हायस्कूल मार्गे पुढे