निगडीत वाहनांची तोडफोड ; दहा वाहनांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 14:52 IST2018-05-27T14:52:46+5:302018-05-27T14:52:46+5:30
रात्री साडेबाराच्या सुमारास यमुनानगर येथील चिकन चाैकात पार्क केलेली 10 वाहनांची टाेळक्याने ताेडफाेड केली.

निगडीत वाहनांची तोडफोड ; दहा वाहनांचे नुकसान
पिंपरी : निगडीतील यमुनानगर येथे अज्ञात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडला. या तोडफोडीत दहा वाहनांचे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार रात्री साडेबाराच्या सुमारास यमुनानगर मधील चिकन चौकात पार्क केलेल्या १० वाहनांची टोळक्याने तोडफोड केली. या मध्ये दुचाकी, तीनचाकी आणि कार या वाहनांचा समावेश आहे. वाहनांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडत असून वारंवार होणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. घरासमोर लावलेली वाहने देखील सुरक्षित नाहीत, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तोडफोड करणाऱ्या अज्ञात टोळक्याविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.दोन दिवसांपुर्वी थेरगाव, वाकड येथे अशाच प्रकारे सात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. वाहनांचे तोडफोड सत्र थांबणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.