शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

दृढनिश्चय! साठाव्या वर्षी पदवीधर होण्याचे कामगार नेत्याचं स्वप्न पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:26 AM

फतेजा फोर्जिंग कंपनीतील कामगार नेते कारभारी पुंडे यांनी वयाच्या साठाव्या वर्षी मुक्त विद्यापीठातून पदवीधर होण्याचे

भोसरी : फतेजा फोर्जिंग कंपनीतील कामगार नेते कारभारी पुंडे यांनी वयाच्या साठाव्या वर्षी मुक्त विद्यापीठातून पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. कारभारी गुलाबराव पुंडे मूळचे शिरूर तालुक्यातील कान्हुर मेसाई या गावचे शेतकरी कुटुंबातील आहेत. सध्या ते भोसरी येथे वास्तव्यास आहेत. परिस्थितीअभावी त्यांना नववीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. मात्र, त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द कायम बाळगली.

भोसरीतील फतेजा फोर्जिंग कंपनीतील कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. कंपनी बंद पडल्यानंतर कामगारांना त्यांची देणी मिळावी यासाठी गेली अनेक वर्षे कामगारांच्या वतीने ते न्यायालयात लढा देत आहेत.पुंडे यांनी २०१४-१५ मध्ये बारावीची बहिस्थ पद्धतीने परीक्षा दिली. त्यामध्ये त्यांना विशेष प्रावीण्य अर्थात डिस्टिंक्शनमध्ये ८१ टक्के गुण मिळाले. दोनदा अपघात झाल्याने त्यांना अपंगत्व आले. मात्र, नैसर्गिक उपचाराद्वारे त्यावर मात करताना त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केला. आता ते इतरांवर निसर्गाेपचार करतात. हे करत असतानाच त्यांनी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स विषयात बी़ए़ची पदवी घेतली. पुढे कायद्याचे शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस आहे.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे