शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत वाहनाच्या धडकेनं डिलिव्हरी दुचाकीस्वार बॉयचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 16:14 IST

अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच घटनेची माहिती न देता पळून गेला.

ठळक मुद्देगंभीर जखमी झाल्याने विश्वनाथ यांचा मृत्यू

पिंपरी : अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील सेंट माउंट चर्चसमोर शनिवारी (दि. ४) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

विश्वनाथ बाबू जमादार (वय ३३), असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत अशोक प्रेमनाथ घोसले (वय ३८, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी रविवारी (दि. ५) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोसले यांचे भाऊजी विश्वनाथ हे झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करत होते. चाकण - वडगाव रस्त्याने डिलिव्हरी देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. सेंट माउंट चर्चसमोर अज्ञात वाहनाने विश्वनाथ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच घटनेची माहिती न देता पळून गेला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकAccidentअपघात