शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

पिंपरी-चिंचवडमध्ये मुद्रांक, कोर्ट फी स्टॅम्प नसल्याने कामकाजाचा खोळंबा; शासनाचाही महसूल बुडतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 12:09 IST

पिंपरीतील मोरवाडी येथील न्यायालयाशी संबंधित नोटरी व्यावसायिक, वकील व पक्षकारांसह नागरिकांची मोठी अडचण

ठळक मुद्देपरवानगी मिळविण्यासाठी नागरिकांना अडचणमुद्रांक व स्टॅम्प नसल्याने दररोज एक लाखाचे नुकसान पिंपरी न्यायालयांतर्गत हजारावर वकील कार्यरत तर दोनशे नोटरी व्यावसायिक

नारायण बडगुजरपिंपरी : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यांत पिंपरी-चिंचवड शहर रेडझोनमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठा, उद्योग व न्यायालयीन कामकाज सुरू झाले आहे. मात्र, मुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्प म्हणून वापरात असलेली तिकिटे उपलब्ध न नसल्यामुळे विविध कामांचा खोळंबा होत आहे. तसेच पिंपरीतील मोरवाडी येथील न्यायालयाशी संबंधित नोटरी व्यावसायिक, वकील व पक्षकारांसह नागरिकांची मोठी अडचण होत असून, मुद्रांक व स्टॅम्प नसल्याने दररोज एक लाखाचे नुकसान होत आहे. यातून शासनाचा मोठा महसूल बुडत आहे.  

पिंपरी न्यायालयांतर्गत हजारावर वकील कार्यरत आहेत. तर दोनशे नोटरी व्यावसायिक आहेत. यातील बहुतांश नोटरी व्यावसायिक न्यायालयाबाहेर त्यांचा व्यवसाय करतात. सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्र, करारनामे, साठेखत, बँकेची गहाणपत्र, घोषणापत्र, विविध परवानगीसाठीचे शपथपत्र आदी कामकाज या नोटरी व्यावसायिकांकडून केले जाते. त्यासाठी ५०० आणि १०० रुपयांचे मुद्रांकाचा आवश्यकतेनुसार वापर केला जातो. त्याचप्रमाणे वकिलांनादेखील न्यायालयीन कामकाजासाठी मुद्रांकांची आवश्यकता असते. न्यायालयात तसेच इतर कायदेशीर बाबींसाठी नागरिकांकडून अर्ज सादर केले जातात. त्या अर्जांवर कोर्ट फी स्टॅम्पची पाच किंवा दहा रुपयांची तिकिटे लावली जातात. 

.....................................

वकील, नोटरी व्यावसायिकांचे नुकसानमुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्पची तिकिटे उपलब्ध होत नसल्याने वकील व नोटरी व्यावसायिकांची अडचण झाली आहे. कामकाज सुरू झाले; मात्र तरीही काम करता येत नाही. परिणामी उत्पन्न बंदच आहे. लॉकडाऊनमुळे अनेक वकील व नोटरी व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांची धडपड आहे. जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा मुद्रांक विभागाचे संचालक यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे. मुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्पची तिकिटे उपलब्ध करून देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड नोटरी असोसिएशनकडून या निवेदनातून करण्यात आली आहे.

.................................

फिजिकल डिस्टन्सिंग पाळून सकाळी ११ ते दुपारी दोनदरम्यान न्यायालयाचे कामकाज होत आहे. या वेळी विविध सुनावण्या तसेच प्रकरणांचे कामकाज केले जात आहे. मात्र, मुद्रांक व कोर्ट फी स्टॅम्पची तिकिटे उपलब्ध नसल्याने कामकाजात अडचण येत आहे. तसेच शासनाचा महसूल बुडून वकील व नोटरी व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.- पांडुरंग नांगरे, अध्यक्ष,पिंपरी-चिंचवड नोटरी असोसिएशन

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडState Governmentराज्य सरकारadvocateवकिलRevenue Departmentमहसूल विभाग