हिंजवडी येथे कारला लागलेल्या आगीत होरपळून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:11 IST2018-09-10T18:09:16+5:302018-09-10T18:11:38+5:30
महिलेला रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी खाजगी रूग्णालयात घेऊन जात असताना ही दुर्देवी घटना घडली.

हिंजवडी येथे कारला लागलेल्या आगीत होरपळून महिलेचा मृत्यू
वाकड : हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई - बंगळूर महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर लाइफ पाँइंट हाँस्पिटलसमोर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास कारला अचानक आग लागली. यामध्ये एका महिलेचा आगीत होरपळून मृत्यु झाला. संगीता मनिष हिवाळे (वय ४४, नखाते वस्ती, सौदर्य काँलनी, रहाटणी) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी खाजगी रूग्णालयात घेऊन जात असताना ही दुर्देवी घटना घडली. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक अपघात म्हणून नोंद केली आहे.