Pune Crime| 'रिलेशनशिपमध्ये रहा नाहीतर मारून टाकेन', अशी धमकी देणाऱ्या तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 15:13 IST2022-02-11T15:12:10+5:302022-02-11T15:13:44+5:30
गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली....

Pune Crime| 'रिलेशनशिपमध्ये रहा नाहीतर मारून टाकेन', अशी धमकी देणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी : रिलेशनशिपमध्ये राहा, नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या २८ वर्षीय तरूणाला अटक केली आहे. हा प्रकार १२ डिसेंबर २०२१ ला दुपारी १ वाजणाच्या सुमारास वाकड येथे घडला होता. या प्रकरणी एका महिलेने गुरूवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. अभिजित मधुकर शिंगन ( वय २८, रा. पिंपळे निलख) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्याकडे रिलेशनशिपमध्ये रहा, म्हणून मागे लागला होता. यावरून फिर्यादी यांनी आरोपी विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु तरी देखील आरोपी फिर्यादी यांचा पाठलाग करीत होता. तसेच फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादी यांना शिवीगाळ आणि मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली