पिंपळे गुरवमध्ये जीवे मारण्याची धमकी बारचालकाकडे खंडणीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 17:30 IST2022-08-16T17:29:48+5:302022-08-16T17:30:01+5:30

खंडणीची मागणी करून दिली जीवे मारण्याची धमकी...

Death threat demands extortion from bar owner in Pimple Gurav | पिंपळे गुरवमध्ये जीवे मारण्याची धमकी बारचालकाकडे खंडणीची मागणी

पिंपळे गुरवमध्ये जीवे मारण्याची धमकी बारचालकाकडे खंडणीची मागणी

पिंपरी : बारचालकाकडे खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ८ ऑगस्टला पिंपळे गुरव येथील टीटॉस रेस्टॉरंट ॲण्ड बार येथे मध्यरात्री घडली. याप्रकरणी विकास अनिल सेवानी (वय २५, रा. पिंपरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. १५) यांनी फिर्याद दिली.

त्यानुसार अशु ऊर्फ आसिफ हैदर हाफसी (वय २३, रा. कासारवाडी), अत्तु ऊर्फ फैजल ईस्माइल शेख (वय २७, कासारवाडी), ॲग्नल ऊर्फ केविन जॉर्ज ॲन्थॉनी (वय २९, रा. पिंपळे गुरव), सुमेरसिंग हरजितसिंग मान (वय २३, रा. पिंपळे गुरव) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनापास जबरदस्तीने टिटॉस रेस्टॉरंट ॲण्ड बारमध्ये घुसले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत ३० हजार रुपये खंडणीची मागणी केली. आरोपी केविन ॲन्थोनी यांनी आपल्याकडे बंदुक आहे, असे भासवत फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

Web Title: Death threat demands extortion from bar owner in Pimple Gurav