थेरगाव येथे आढळला चार वर्षाच्या मुलाचा कुजलेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 21:52 IST2018-12-07T21:52:03+5:302018-12-07T21:52:44+5:30
थेरगाव, गुजरनगर येथे ४ ते ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत सापडला.

थेरगाव येथे आढळला चार वर्षाच्या मुलाचा कुजलेला मृतदेह
पिंपरी : थेरगाव, गुजरनगर येथे ४ ते ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत सापडला. गुजरनगर येथील भगवती पॅलेस सोसायटी व अक्षय पार्क यांच्यातील मोकळ्या जागेत एक मृतदेह असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसले. याबाबत तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले. त्यानंतर वाकड पोलीस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून चेहराही स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. घातपाताचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, याबाबत पोलीस निरिक्षक (गुन्हे) सुनील पिंजण म्हणाले की, ४ ते ५ वर्षे मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आहे. चेहरा स्पष्ट दिसत नसून ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.