Pimpri Chinchwad: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, वाकड पूलावरील घटना
By प्रकाश गायकर | Updated: January 8, 2024 15:27 IST2024-01-08T15:26:58+5:302024-01-08T15:27:43+5:30
ही घटना मंगळवारी (दि. २) पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास वाकड पूलावर, वाकड येथे घडली....

Pimpri Chinchwad: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, वाकड पूलावरील घटना
पिंपरी : दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २) पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास वाकड पूलावर, वाकड येथे घडली.
अतुल संजय कागणे (वय २४, रा. धुळे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुनील काटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल कागणे हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १८/सीबी १५३३) जात होते. वाकड ब्रिजवर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये कागणे दुचाकीवरून खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला आणि शरीराला ठिकठिकाणी गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.