शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवड शहरातील भाजी मंडईत उसळली गर्दी; पोलिसांचा सौम्य लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 17:30 IST

बुधवारी पहाटेपासून नागरिकांनी भाजी घेण्यासाठी गर्दी केली ..

ठळक मुद्देमहापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयाअभावी नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण राज्य राखीव दलाच्या जवानांनाही मंडई परिसरात जाऊन गर्दी कमी करण्याचे दिले आदेश

पिंपरी: महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयाअभावी नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून आहे. या गोंधळातूनच पिंपरी भाजी मंडईत बुधवारी पहाटेपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आहेपिंपरी चिंचवड शहरातील सर्व भाजी मंडई चार दिवसांपासून बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. बंदीची ही मुदत बुधवारी संपुष्टात येत असल्याने महापालिका आयुक्तांनी एक परिपत्रक काढून बुधवारपासून सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत मंडई सुरू राहणार असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा एकदा परिपत्रक काढून बुधवारी भाजी मंडई बंद राहणार असून या भाजी मंडई मोकळ्या जागेत स्थलांतरीत केल्या जातील, असे जाहीर केले. तसेच भाजी आणि फळ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांबाबत पुढील काळात निर्णय घेतला जाईल, असेही या नवीन आदेशात म्हटले. मात्र या नवीन आदेशाची माहिती नागरिकांपर्यंत पोचलीच नाही. तर दुसरीकडे पोलिसांनी लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे परिपत्रक काढले. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू भाजी, फळे किराणा विक्री सुरू राहणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले.

बुधवारी पहाटेपासून नागरिकांनी भाजी घेण्यासाठी गर्दी केली. त्यावेळी मंडईत अवघे दोनच पोलीस कर्मचारी होते. मात्र त्यांनीही याबाबत वरिष्ठांना कळविले नाही. याबाबतची माहिती मिळाल्यावर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे पिंपरी भाजी मंडई परिसरात आले. त्यांनी पिंपरी भाजी मंडईतील गदीर्बाबत महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना कळविले. पोलीस आयुक्तांनी याबाबत वायरलेसद्वारे सूचना केल्यावर पोलिसांची धावपळ उडाली. पिंपरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी पिंपरी भाजी मंडईत हजर झाले. तसेच राज्य राखीव दलाच्या जवानांही पाचारण करण्यात आले.

पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त राम जाधव, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे सहाय्यक निरीक्षक सुधीर चव्हाण यांनी पिंपरी भाजी मंडईत धाव घेऊन गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी जादा प्रमाणात असल्याने अखेर राज्य राखीव दलाच्या जवानांनाही मंडई परिसरात जाऊन गर्दी कमी करण्याचे आदेश दिले. राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी सौम्य लाठीमार केल्याने काही वेळेतच जमाव पांगला. आता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोस्त ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसvegetableभाज्याfruitsफळेPoliceपोलिस