नाना पटोलेंवर टीका करताना भाजपाच्या महिला महापौरांची जीभ घसरली, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 19:47 IST2022-01-18T19:36:21+5:302022-01-18T19:47:14+5:30

ढोरे यांनी पटोले यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली आहे..

criticizing nana patole bjp pcmc mayor usha dhore tounge slipped narendra modi | नाना पटोलेंवर टीका करताना भाजपाच्या महिला महापौरांची जीभ घसरली, म्हणाल्या...

नाना पटोलेंवर टीका करताना भाजपाच्या महिला महापौरांची जीभ घसरली, म्हणाल्या...

पिंपरी-चिंचवड: सध्या राज्यभरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी मोदी नावाच्या व्यक्ती बद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या (PCMC) महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे. ढोरे यांनी पटोले यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली आहे. ढोरे नाना पटोलेंवर टीका करताना म्हणाल्या, पटोले यांना डांबरी रस्त्यावर आणून तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू. यावेळी, महापौरांसोबत भाजपच्या इतर कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या फलकावरील फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला. 

पुढे बोलताना महापौर ढोरे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबद्दल अशी भाषा पटोले करत असतील तर समोर त्यांनी समोर यावं, आम्ही महिलाच बास झालोत. त्याला डांबरी रस्त्यावर तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू,” असा एकेरी उल्लेख करत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले हे भाष्य निंदनीय आहे.

नाना पटोले यांना एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं शोभत नाही. त्यांना मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची किंमत कळत नसेल तर ते काँग्रेसचे अध्यक्ष राहण्याच्या लायकीचे नाहीत. काँग्रेस पक्ष पटोलेंसारख्या नालायक लोकांना अध्यक्ष करून माणसांच्या अंगावर कुत्र्यासारखे सोडत असतील, तर ते अशोभनीय आहे,” असंही ढोरे म्हणाल्या.

Web Title: criticizing nana patole bjp pcmc mayor usha dhore tounge slipped narendra modi