महिलेच्या मृत्यू प्रकरणी पतीवर तीन वर्षांनी गुन्हा दाखल; शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 11:15 IST2021-01-25T11:14:05+5:302021-01-25T11:15:03+5:30
आरोपी आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता.

महिलेच्या मृत्यू प्रकरणी पतीवर तीन वर्षांनी गुन्हा दाखल; शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू
पिंपरी : आकुर्डी येथील अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला होता. तीन वर्षांपूर्वी झालेल्या या अपघातप्रकरणी महिलेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघातप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश मोरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास माधव कदम (वय ४८, रा. घरकुल, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विलास कदम याच्या ४० वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना ८ नोव्हेंबर २०१७ रोजी सीबीआय क्वार्टर जवळ आकुर्डी येथे घडली. आरोपी विलास आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात होते. विलास याने भरधाव वेगात, निष्काळजीपणे दुचाकी चालविली. यात दुचाकीवर मागे बसलेली त्याच्या पत्नीचा दुचाकीवरून खाली पडून मृत्यू झाला.
तीन वर्ष सुरू होती चाैकशी?
आरोपी विलास कदम आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात असताना अपघात झाला होता. यात विलास याच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यात तपास करून चाैकशीअंती तीन वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
.