बनावट दाखले तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर २७ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 19:45 IST2019-11-19T19:43:50+5:302019-11-19T19:45:25+5:30
बनावट रहिवासी दाखले आरोपींनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे सादर केले.

बनावट दाखले तयार करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर २७ जणांवर गुन्हा
पिंपरी : परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी बनावट दाखल्यांद्वारे केलेला फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑटोरिक्षा बॅचसाठी बनावट रहिवाशी दाखले परिवहन विभागाला दिले आहेत. याप्रकरणी २७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसीर, महम्मद अली हबीब अली सय्यद (रा. ओटास्कीम, निगडी), शिवाजी शंकर डोलारे (रा. देहूरोड), मुबारक महेबूब शेख (रा. ओटास्कीम, निगडी) आणि अन्य २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा बॅचसाठी अनेक कागदपत्रे लागतात. त्यापैकी बनावट रहिवासी दाखले आरोपींनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे सादर केले. कागदपत्रांची पडताळणी करत असताना ही बाब परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. १९ जानेवारी २०१९ ते ७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. त्यानुसार ही बनावट कागदपत्रे सादर करणाºया एकूण २७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.