पिंपरी : महापालिकेतील अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी पिंपरी येथे घडली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल तानाजी कलाटे (वय ३५, रा. वाकड) आणि विनोद मोरे (वय २८, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अनिल महादेव राऊत (वय ५२, रा. आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी सायंकाळी पावणेसहाला सुमारास विनोद मोरे यांनी फिर्यादी राऊत यांना फोन केला. कलाटे यांच्या टीडीआर फाईलवर सही का केली नाही म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर कलाटे यांनी फोनवरून राऊत यांना शिवीगाळ केली. त्यानंतर महापालिका भवनातील कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या कार्यालयात राऊत यांच्यावर कलाटे यांनी खुर्ची फेकून मारली. तसेच राऊत यांची गचंडी पकडून सरकारी कामात अडथळा आणला.
महापालिकेतील अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या गटनेत्याविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 19:11 IST