शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरातील २०० परमीट रुम, बिअरबार राहणार बंद : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 21:18 IST

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या अकरावर

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : कोट्यवधींची उलाढाल होणार ठप्प

पिंपरी : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तारांकित हॉटेल वगळून इतर हॉटेलमधील मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सुमारे दोनशे परमीट रुम व बिअर बार बंद राहणार आहेत. वाईन शॉप, बिअर शॉपी तसेच देशी दारु विक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत. खाद्यगृह अत्यावश्यक सेवा असून, ते बंद करण्यात येऊ नयेत, अशी मागणी करण्यात येत आहे.पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या अकरावर गेली आहे. त्यामुळे अधिक दक्षतेच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी (दि. १८) मद्यविक्रीबाबत निर्देश दिले आहेत. पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम १४२ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे.विदेशी पर्यटक तसेच परदेशातून आलेले नागरिक पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यातील काही जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हॉटेल, परमीट रुम व बिअर बार अशा ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर बार रेस्टॉरन्ट, परमीट रुम, बिअर बार १८ ते ३१ मार्च दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. 

कोट्यवधींची उलाढाल होणार ठप्पपिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत लहान-मोठे असे एकूण ८०० हॉटेल आहेत. यात सुमारे २०० बिअरबार, परमिट रुम आहेत. त्यामुळे हे सर्व बिअरबार, परमीट रुम बंद राहणार आहेत. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. 

खाद्यगृह सुरू ठेवापिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आहेत. ते हॉटेल व खानावळींमध्ये दररोजचे जेवण घेतात. त्यामुळे अशी खाद्यगृहे अत्यावश्यक सेवेत मोडतात. ही खाद्यगृहे व हॉटेल बंद करण्यात येऊ, नयेत अशी मागणी पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीची उपाययोजना हॉटेल व्यावसायिकांकडून हॉटेल, खाद्यगृहे व खानावळीतून घेण्यात येत आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी व कार्याध्यक्ष गोविंद पानसरे यांनी दिली.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडliquor banदारूबंदीcollectorजिल्हाधिकारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस