Corona Virus Vaccine : पिंपरी शहरातील लसीकरणाचा वेग मंदावला; बुधवारपर्यंत ९४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली लस 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 11:23 AM2021-01-22T11:23:38+5:302021-01-22T11:26:58+5:30

आरोग्य कर्मचारी लसी घेण्यासाठी पाठ फिरवत असल्याचे आकडेवारीवरून समोर

Corona Virus Vaccine : Vaccination in Pimpri slows down; As many as 947 health workers were vaccinated till Wednesday | Corona Virus Vaccine : पिंपरी शहरातील लसीकरणाचा वेग मंदावला; बुधवारपर्यंत ९४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली लस 

Corona Virus Vaccine : पिंपरी शहरातील लसीकरणाचा वेग मंदावला; बुधवारपर्यंत ९४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली लस 

Next
ठळक मुद्देआठ केंद्रे मि‌ळून बुधवारपर्यंत झाले ९४७ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

पिंपरी : शहरात १६ जानेवारीला उत्सवी वातावरणात कोरोना प्रतिबंध लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी शहरातील आठही केंद्रांवर उत्साह दिसून आला. मात्र, आता आरोग्य कर्मचारी लसी घेण्यासाठी पाठ फिरवत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

पहिल्या दिवशी (शनिवारी) ४५६ जणांनी लस घेतली. मंगळवारी २७८, बुधवारी २१३ जणांनी लस घेतली यावरून लसीकरणाचा टक्का घसरत असल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या दिवशी नवीन जिजामाता रुग्णालयात लसीकरणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यादिवशी ७१ कर्मचाऱ्यांनी नवीन जिजामाता रुग्णालयात लस टोचून घेतली. त्यादिवशी सर्वाधिक लसीकरण हे जिजामाता रुग्णालयात झाले होते. त्यानंतर दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. मंग‌ळवारी जिजामाता रुग्णालयात अवघ्या ६ जणांनी लस टोचून घेतली. बुधवारी १५ जणांनी येथे लस टोचून घेतली. यावरून पहिल्या दिवशी दिसलेला उत्साह आता दिसून येत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने लसीकरणासाठी शहरात आठ केंद्रे सुरू केले आहेत. प्रत्येक केंद्रावर दिवसाला १०० जणांचे लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. म्हणजे दिवसाला ८०० जणांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे.
नागरिकांमध्ये लसीबाबत कोणताही भीती राहू नये, म्हणून सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. लसीबाबत वेगवेग‌‌ळ्या प्रकारच्या अफवा सध्या पसरत आहे. त्याचा परिणाम हा लसीकरणावर होत आहे. त्यामुळे अफवा थांबवून, लसीबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.
----

बुधवारपर्यंत झालेले लसीकरण

यमुनानगर रुग्णालय - १२९
नवीन जिजामाता रुग्णालय - ९२
नवीन भोसरी रुग्णालय - १३३

वायसीएम रुग्णालय - १५३

पिंप‌ळे निलख रुग्णालय - १२५
कासारवाडी दवाखाना - १०४
तालेरा रुग्णालय -            ११९

ईएसआयएस रुग्णालय -   ९२

                                    एकूण ९४७
---
शनिवारी ४५६, मंग‌ळवारी २७८, बुधवारी २१३

---

लसीकरण कमी होण्याची कारणे
लसीची सुरक्षितता, परिणामकारतेबाबत साशंकता.
कोविन ॲपच्या माध्यमातून तयार होणाऱ्या लाभार्थींच्या यादीतील त्रुटी.

लसीबाबत पसर असलेल्या अफवा.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने भीती झाली कमी.
रुग्णसंख्येबरोबर मृत्यूदर कमी झाला.
आरोग्यसेवेत काम करूनही अनेकांना कोरोनाची लागण झाली नाही. त्यामुळे लस घ्यायची की नाही, याबाबत असलेली शंका.

इतर आजार असल्याने काही जण राहिले अनुपस्थित.

--
वायसीएमला सर्वाधिक लसीकरण

बुधवार २० जानेवारीपर्यंत शहरातील आठ केंद्रांपैकी सर्वाधिक लसीकरण हे वायसीएम रुग्णालयात झाले आहे. या केंद्रावर १५३ जणांनी लस घेतली आहे. नवीन जिजामाता रुग्णालय आणि ईएसआयएस रुग्णालय या दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी ९२ जणांनी लस घेतली आहे. या दोन्ही केद्रांवर झालेले हे लसीकरण हे इतर केंद्रांच्या तुलनेने कमी आहे.

Web Title: Corona Virus Vaccine : Vaccination in Pimpri slows down; As many as 947 health workers were vaccinated till Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.