शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी शहरात कोरोना रुग्णांच्या ट्रेसिंगचा उडाला बोजवारा; पॉझिटिव्ह रुग्णांची झपाट्याने वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 14:52 IST

महापालिकेच्या प्रशासनाची यंत्रणा पडतेय अपुरी

ठळक मुद्देसध्या आठ किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळलेला परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करण्याचे धोरणकोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त तपासणी व निदान आवश्यक

नारायण बडगुजर- पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या परिसरात १० दिवस तपासणी केली जाते. संबंधित रुग्णांच्या हायरिस्क व लो रिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिकांचा शोध (ट्रेसिंग) घेऊन   तपासणी केली जाते, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जातो. प्रत्यक्षात मात्र प्रशासनाकडे अपुरी यंत्रणा असल्याने त्यांना शक्य तेवढेच ट्रेसिंग व टेस्टिंग, तसेच सर्वेक्षण होत असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत समोर आले. प्रशासनाकडून ट्रेसिंग होत नसल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत दररोज हजारावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत.  या पॉझिटिव्ह रुग्णांच्या हायरिस्क व लोरिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिकांचा शोध घेऊन अर्थात ‘ट्रेसिंग’ करून तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित रुग्णांच्या परिसरात सर्र्वेक्षण आवश्यक आहे. मात्र ट्रेसिंग, टेस्टिंग व सर्वेक्षण प्रत्यक्षात होत नसून त्याचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. 

कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात रुग्ण आढळलेला परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषीत केला जात. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर रुग्ण आढळलेली इमारत कन्टेन्मेंट करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे संबंधित परिसर प्रतिबंधित न करता केवळ इमारत कन्टेन्मेंट करण्यात येत होती. मात्र अशा इमारत अथवा घरात कोणीही सहज ये-जा करू शकत असल्याने संशयित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले. यातून कोेरोनाचा संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. तसेच सध्या आठ किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळलेला परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित करण्याचे धोरण आहे. तरीही प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही.

वाढत्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त तपासणी व निदान आवश्यक आहे. तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे, त्यांच्या चाचण्या व विलगीकरण ही प्रक्रिया वेळेत व्हायला पाहिजे. त्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र पथक नियुक्त केले आहेत. मात्र ही पथके पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. तसेच त्यांच्यावर प्रशासनाचे पूर्ण नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री ट्रेसिंग व सर्वेक्षण केले जात आहे. यातून चुकीची आकडेवारी उपलब्ध होत असून, योग्य माहिती समोर येत नाही. परिणामी कोरोनावरील उपाययोजना व त्यांची अंमलबजावणी कुचकामी ठरत आहे. 

पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्यामुळे देखील कामाचा बोजवारा उडत आहे. शिक्षक, पीएमपीएमएल कर्मचारी आदींना सर्व्हेक्षणाची जबाबदारी दिली आहे. मात्र आवश्यक सुरक्षासाधने उपलब्ध होत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व्हेक्षण करताना अडचणी येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्था, विविध संघटना तसेच राजकीय कार्यकर्ते यांची मदत घेता येणे शक्य आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत असल्यामुळेच दररोज सरासरी चार हजार चाचण्या होत आहेत. त्यामुळे निदान होऊन हजारावर रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेली इमारत प्रतिबंधित न करता मोठे कन्टेन्मेंट झोन केले जात आहेत.- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरMayorमहापौर