Corona virus : पिंपरी - चिंचवड पोलीस दलात कोरोनाचा तिसरा बळी; रमेश लोहकरे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 12:52 IST2020-10-23T12:51:39+5:302020-10-23T12:52:19+5:30
चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Corona virus : पिंपरी - चिंचवड पोलीस दलात कोरोनाचा तिसरा बळी; रमेश लोहकरे यांचे निधन
पिंपरी : चिंचवड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक रमेश लोहकरे (वय ३७) यांचे शुक्रवारी कोरोनाने (कोविड १९) निधन झाले. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील कोरोनाचा हा तिसरा बळी ठरला आहे.
लोहकरे यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांची तपासणी केली असता, त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. लोहकरे पत्नी आणि मुलीसह चिंबळी येथे वास्तव्यास होते. शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून लोहकरे प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने चिंचवड पोलीस ठाणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस दलातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.