Corona virus : Number of corona patients in Pimpri city at 511; new 18 patients were found | Corona virus : पिंपरी शहरातील कोरोनारुग्णांची संख्या ५११ वर; शनिवारी दिवसभरात १८ रुग्ण

Corona virus : पिंपरी शहरातील कोरोनारुग्णांची संख्या ५११ वर; शनिवारी दिवसभरात १८ रुग्ण

ठळक मुद्देआनंदनगर, बौद्धनगर, वाकड, दापोडी, सांगवी, चिखली कोरोनाचे रुग्ण शहरात आजपर्यंत 20 जणांचा बळी

पिंपरी : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आनंदनगर,  बौद्धनगर, सांगवी, दापोडी, वाकड, नेहरू नगर, परंडवडी, चिखली आणि पुण्यातील १८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरातील रुग्णांची संख्या ५११ वर पोहोचली आहे. शहरालगत च्या ग्रामीण भागातही कोरोना वाढत आहे.

 पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णांची वाढ होत होती. ती आज कमी झाली आहे. शनिवारी १८ रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्या ५११ वर पोहचली आहे. २२२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  शहरातील २८ रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील तर महापालिका हद्दीबाहेरील ४० रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आजपर्यंत २४९ जण कोरोनामुक्त झाले असून, आजपर्यंत पुण्यातील बारा  आणि पिंपरी-चिंचवडमधील आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
..................
२५९ जणांचे अहवाल प्रलंबित

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात ११२ जणांना दाखल केले आहे. त्यामुळे एकूण दाखल रुग्णांची संख्या ५४९ झाली आहे. तर आज ९६रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ११ जणांना आज डिस्चार्ज दिला आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील ११ पुरुष, ३ महिला आणि पुण्यातील ३ पुरुषांचा आणि एक महिलेचा  समावेश आहे. त्यामध्ये  भोसरी,  आनंदनगर, बौद्धनगर, वाकड, नेहरूनगर, मावळातील परंडवडी, चिखली, खेड तालुक्यातील पाईटआणि पुण्यातील नागरिकांचा समावेश आहे. तर ३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज दिला आहे. त्यात आनंदनगर, आळंदी रोड,  रुपीनगर,  बौद्ध नगर,   सांगवी,  नेहरूनगर,  दापोडी, वाकड, भागातील नागरिकांचा समावेश आहे. २५९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
............................
शहरात आजपर्यंत 20 जणांचा बळी
पिंपरीतील वायसीएम आणि भोसरीतील महापालिकेच्या रुग्णालयात कोरोना बाधित व्यक्ति वर उपचार सुरू।आहेत.आज एकही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.  कोरोनाने २० वा बळी घेतला आहे. बळींमध्ये पुण्यातील १२ तर पिंपरीतील आठ जणांचा समावेश आहे.
 

Web Title: Corona virus : Number of corona patients in Pimpri city at 511; new 18 patients were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.