Corona virus : पिंपरीत कोरोनाचा विळखा वाढतोय; शहरातील बाधितांची संख्या ३७ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 20:58 IST2020-04-14T20:57:02+5:302020-04-14T20:58:35+5:30

तबलिगीच्या सहवासात आलेल्यांची पॉझिटिव्ह रुग्णांत समावेश

Corona virus : Number of corona inffected patient is at 37 in the pimpri | Corona virus : पिंपरीत कोरोनाचा विळखा वाढतोय; शहरातील बाधितांची संख्या ३७ वर

Corona virus : पिंपरीत कोरोनाचा विळखा वाढतोय; शहरातील बाधितांची संख्या ३७ वर

ठळक मुद्देरविवारी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण

पिंपरी :  शहरात मागील सहा दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये भर पडत आहे. सोमवारी रात्री दोन पुरुष रुग्णांची भर पडली आहे. दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या दोन पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चौदा दिवसांत २४ रुग्ण आढळून आले आहेत. सहा दिवसांत सतरा नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामधील एक रुग्ण दिल्लीतील तबलिगीच्या कार्यक्रमातून आलेल्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ वर पोहोचली आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा विळखा वाढत आहेत. तबलिगीच्या सहवासात आलेल्यांची पॉझिटिव्ह रुग्णांत समावेश आहे. सोमवारी रात्री दोन जण आढळले आहेत. त्यात एकाचे २३ आणि दुसऱ्या रुग्णाचे ४८ वय आहे. दुसरा रुग्ण कोणाच्या संपर्कात आला होता, त्याची हिस्ट्री काय आहे, याची माहिती काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या दोघांचे आता रिपोर्ट आले असून, दोघे पॉझिटिव्ह आले आहेत.
-----------------
विळखा घट्ट होतोय
 रविवारी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर दुपारी नर्सच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. अशा पाच जणांना रविवारी एकाच दिवशी कोरोनाची लागण झाली होती. तर ८ एप्रिलपासून शहरात दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत. मागील सहा दिवसांत तब्बल १७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. ८ एप्रिलला एक, ९ ला तीन, १०  एप्रिल रोजी चार, ११ एप्रिलला दोन, १२ एप्रिलला पाच आणि सोमवारी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित सक्रिय २४ रुग्ण शहरात आहेत. त्यातील २१ रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम  रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तीन सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


 

Web Title: Corona virus : Number of corona inffected patient is at 37 in the pimpri