Corona virus : पिंपरीत कोरोनामुक्तांची संख्या वाढली दुपटीने; ६५५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 22:00 IST2020-09-21T21:59:08+5:302020-09-21T22:00:19+5:30
आजपर्यंत शहरातील एकूण ५७ हजार ११३ जण कोरोनामुक्त झाले..

Corona virus : पिंपरीत कोरोनामुक्तांची संख्या वाढली दुपटीने; ६५५ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण
पिंपरी : औद्योगिकनगरीत सोमवारी ६५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ११२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील ११ आणि पुण्यातील ३ अशा एकूण २० अशा एकुण ३१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ५ हजार २१२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. ३ हजार १८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात वैद्यकीय विभागाच्या वतीने संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्या आहेत. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम महापालिकेने सुरू केला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले असून निगेटिव्ह अहवाल येण्याची संख्या वाढत आहेत. त्यामुळे डिस्चार्ज होणा रुग्णांची संख्या वाढली आहे.
दिवसभरात २ हजार ६८४ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी ३१८५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ७० हजार ८२७ वर पोहचली आहे. तर १ हजार ७०१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ३ हजार ११० जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार २१२ झाली आहे.
...........................
१७०१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत
महापालिका परिसरातील रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या कमी झाली आहे. १७०१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ११२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण ५७ हजार ११३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
.....................
मृतांमध्ये तरुण आणि वृद्धांची संख्या अधिक
पिंपरी-चिंचवड शहरातील ११ आणि पुण्यातील २० अशा एकूण ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ११५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तरूणांची, वृद्धांची संख्या अधिक आहे. त्यात पाच तरूण तर सहा ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.