शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन काळात ' गुन्हे डाऊन '

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 15:09 IST

शहरातील नागरिक घरात व पोलीस रस्त्यावर असल्याचा परिणाम

ठळक मुद्दे2019 जानेवारी ते जूनदरम्यान विविध प्रकारचे 3660 गुन्हे2020 जानेवारी ते जूनदरम्यान विविध प्रकारचे 2171 गुन्हेगेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १४८९ गुन्हे कमी

पिंपरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे गुन्ह्यांमध्ये घट झाली. खून, दरोडा, बलात्कार असे गंभीर स्वरूपाचे गुन्हेदेखील यंदा कमी झाले. विशेष म्हणजे जबरी चोरी व सोनसाखळी चोरीचे प्रकारही कमी झाले. नागरिक घरात व पोलीस रस्त्यावर असल्यामुळेदेखील या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येते. २०१९ मध्ये जानेवारी ते जूनदरम्यान विविध प्रकारचे ३६६० तर, यंदा याच कालावधीत २१७१ गुन्हे दाखल झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १४८९ गुन्हे कमी झाले.

उद्योगनगरी असल्याने शहर व परिसरात गुन्ह्यांचा आलेख सातत्याने चढता होता. त्यामुळे १५ आॅगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. मात्र, पुरेसे मनुष्यबळ नसतानाही गुन्हेगारी रोखण्यावर मर्यादा येत आहेत. त्यातच यंदा कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले. तोकड्या मनुष्यबळावर त्याची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी शहर पोलीस दलावर आली. त्यासाठी विशेष व इतर सर्व पथके रद्द करून बंदोबस्तावर भर दिला. 

जमाव, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने खटले दाखल

१देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन  केले आहे. या काळात विनाकारण बाहेर फिरणे, मास्क न वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे असे प्रकार काही नागरिकांकडून झाले. अशा नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये कारवाई करून ३० हजारांवर खटले दाखल केले आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून आस्थापना किंवा दुकान सुरू ठेवणे, सुरक्षा साधनांचा वापर न करणे याप्रकरणीदेखील कारवाई केली. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात पोलिसांनी अशा नागरिकांना चोप दिला.

सरकारी कामांमध्ये अडथळा आणणाºयांमध्ये झाली घट

२सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर हल्ले करून सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचे गुन्ह्यांमध्ये देखील घट झाली. जानेवारी ते जून दरम्यान गेल्या वर्षी ३३ तर यंदा २६ गुन्हे दाखल केले आहेत. यात पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून याप्रकरणी गेल्या वर्षी २१ तर यंदा २३ गुन्हे दाखल आहेत. यात वाहतूक पोलिसांचे प्रमाण अधिक आहे. वाहतूक नियमनासाठी शहरातील मुख्य रस्ते तसेच मुख्यि चौकांमध्ये पोलिसांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे या पोलिसांचा थेट वाहनचालक व नागरिकांशी संपर्क येतो. वाहन अंगावर घालणे, अरेरावी करणे, दंड आकारण्यास किंवा कारवाईस विरोध करणे, असे प्रकार वाहनचालकांकडून केले जातात. पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार सातत्याने होतात.  

 

शहरात दाखल गुन्हे

 

गुन्हा             २०१९              २०२०

खून               ३३                    २९

खुनाचा प्रयत्न ५२                    ३२

दरोडा          १६                     १२

दरोड्याची तयारी ६                — 

जबरी चोरी        १८५            ६१

सोनसाखळी चोरी ३४।            ७

इतर जबरी चोरी १५१            ५४

घरफोडी।         १९७           ११६

चोरी               ११५३         ५६०

दंगा               ११०              ९४

फसवणूक     २०४             १०७

बलात्कार     ८७                  ६२

विनयभंग   २६५                १५२

पळवून नेणे २६८।             १४८

विश्वासघात २२।                १४ 

दुखापत ३८०                  ३२९

आत्महत्या नवविवाहित २६     २६

प्राणांतिक अपघात    १६६     १२०

पॉकेट चोरी              २          १

इतर चोरी          ४३४          १८६

मालमत्तेचे गुन्हे १५५१ ७४९

इतर गुन्हे ४७० २९३

सरकारी कामात अडथळा निर्माण करणे ३३ २६

 

 

१ जानेवारी ते ३० जून  

चोरी                   २०१९                                            २०२० 

वाहन           दाखल      उघड               दाखल      उघड

दुचाकी        ६०६       १२१                   ३१३       ४६

तीनचाकी।   १२           ५                        ६         १

चारचाकी   ६३           १५                       ३८       ७

एकूण       ६८१        १४१।                   ३५७    ५४

सायकल    २५           ५                       —     —

वाहन पार्ट ९ १ ७ २

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस