Corona Virus : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ओलांडला ४५ हजारांचा टप्पा; गुरुवारी ११०५ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 21:16 IST2020-08-27T21:14:01+5:302020-08-27T21:16:39+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ३१८६३ रुग्ण झाले कोरोनामुक्त

Corona Virus : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी ओलांडला ४५ हजारांचा टप्पा; गुरुवारी ११०५ नवे रुग्ण
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, गुरुवारी दिवसभरात ११०५ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५५१० झाली. दिवसभरात ७२७ जण कोरोनामुक्त झाले. तर ३६८३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात २४०१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात गुरुवारी दिवसभरात ११ जण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील एकाचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ८५० तर महापालिका हद्दीबाहेरील १७३ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच २५०१ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ३३२७ जणांना घरी सोडण्यात आले. तर ५०८७ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ७२८ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील १७६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ३१८६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह १३५ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.