शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

Corona Virus : मास्क खरेदी करताय का, कोरोना घरी घेऊन जाताय?; पिंपरीतील रस्त्यावर मास्कची सर्रास 'ट्रायल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 13:23 IST

काळजी घ्या, सुरक्षित रहा ..

तेजस टवलारकर -

पिंपरी : कोरोनाच्या पूर्वी शहरातील मोजक्याच दुकानात मास्क विकण्यासाठी उपलब्ध होते. परंतु मार्च पासून कोरोनाचे संकंट सुरू झाले, आणि शहरातील रस्त्यांवर मास्कचे दुकान मोठ्या प्रमाणावर लागले. रस्त्यांवर लागलेल्या दुकानांमध्ये काही नागरिक मास्क घेण्यासाठी येतात. तेव्हा मास्कची ट्रायल घेतात. ट्रायल केलेला मास्क घेत नाहीत. दुकानदारही तो मास्क वेगळा काढून ठेवत नाही. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचे  रुग्ण वाढण्याचा धोका आहे.

विशेष म्हणजे कशाचीही भीती न ठेवता असे नागरिक मास्कची ट्रायल घेतात. शहरात आता कोरोनाचे  रुग्ण कमी होताहेत. परंतु नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नाहीतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढण्या वेळ लागणार नाही. सध्या नागरिक विविध प्रकारचे आणि विविध रंगांचे मास्क विकत घेण्यास पसंती देत आहेत. परंतु यात कोरोनाचे गांभीर्य कमी होता कामा नये. शासनाने ठरलेले नियम नागरिकांनी आणि दुकानदारांनी पाळणे गरजेचे आहे.

पिंपरी शहरात पाहाणी केली असता या परिसरात रस्त्यांवर मास्कची दुकाने लागली आहेत. परंतु मास्क उघड्यांवर टागलेले आहेत. काही नागरिक हे मास्कला सर्रास हाल लावतात. कोणताही का‌ळजी घेत नाही. दुकादारही ग्राहकांना काहीच म्हणत नसल्याचे चित्र येथे दिसून आले. दुकानदारांना विचारले असता काही नागरिकच असे करतात, असे त्यांनी सांगितले. या परिसरात अनेर लोक विना मास्क फिरत असल्याचे दिसून आले.पिंपरी मार्केट या परिसरात कोरोनाचे  रु्गण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. या परिसरात देखील काही लोक मास्कच्या दुकानात विचारपुस करण्यासाठी येतात. मास्क हाल लावतात. दुकानदारही हात लावलेल्या मास्कला वेगळे ठेवत नसल्याचे दिसून आले.  काही नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

या भागात रस्त्यांवर लागलेल्या मास्कची दुकाने कमी प्रमाणात दिसून आली. त्यामुळे साहाजिकच गर्दी कमी होती. त्याचबरोबर नागरिक मास्क लावत असल्याचे दिसून आले. काही दुकांनांमध्ये पाहीणाी केली असता. नागरिक मास्क हाल लावत नाही असे दिसले. तर दुकानदारांनी मास्क झाकुन ठेवले होते. त्याचबरोबर काही ठिकाणी मास्क लाबूनच बघा असे सांगितले जात होते.

 ग्राहकांना काय वाटते? मास्कचा वापर कोरोनापासून बचाव करण्यासाठी होणे अपेक्षित आहेत. परंतु सध्या काही लोक फँशन म्हणून मास्कचा वापर करत आहेत. दुकानादारांनी ग्राहकांना मास्कला हात लावू देऊ नये, असे रमेश सुने म्हणाले.

 ज्या मास्कची ट्रायल घेतली जाते. असे मास्क दुकानदारांनी वेगळे काढावे. ते विकू नये. काही लोकांमुळे बाकीच्या नागरीकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता यातून नाकारता येत नाही, असे सचिन पाटील म्हणाले.

.......

 ट्रायल केलेले मास्क विकु नये. नागरिकांनी मास्क घेतांना काळजी घ्यावी. नागरिकांनाही मास्क घेतांना ट्रायल केलेले मास्क घेवू नये.- डाँ. पवन साळवे,मुख्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य