Corona virus : दिलासादायक! पिंपरी-चिंचवड शहरातील ५० हजार रुग्णांनी आतापर्यंत केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 12:21 PM2020-09-14T12:21:57+5:302020-09-14T12:22:30+5:30

शहरातील कोरोना रुग्णांनी केला ६३ हजारांचा टप्पा पार केला

Corona virus : 50,000 patients of pimpri chinchwad city Corona free | Corona virus : दिलासादायक! पिंपरी-चिंचवड शहरातील ५० हजार रुग्णांनी आतापर्यंत केली कोरोनावर मात

Corona virus : दिलासादायक! पिंपरी-चिंचवड शहरातील ५० हजार रुग्णांनी आतापर्यंत केली कोरोनावर मात

googlenewsNext
ठळक मुद्देदिवसभरात १६८२ जण कोरोनामुक्त :  नवे १०२८ रुग्ण  

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, रविवारी दिवसभरात १०२८ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३,६२२ झाली. महापालिका हद्दीबाहेरील १० नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दिवसभरात १६८२ जण कोरोनामुक्त झाले. तर ४,१६४ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ३३९९ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात रविवारी दिवसभरात ३० रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील १७ जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १०३९ तर महापालिका हद्दीबाहेरील २९१ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. तसेच ३४१६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ४८१८ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६,६१६ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ११६४ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील ३०९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ५०,०४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ३९० रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.

उद्योगनगरीची चिंता वाढली
शहरातील कोरोना रुग्णांनी ६३ हजारांचा टप्पा पार केला असून चिंता व्यक्त केली जात आहे. दररोज हजारावर नवे रुग्ण आढळत आहेत. असे असले तरी आजअखेर ५३१३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत २६२०८० संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले असून त्यातील २५१५९० रुग्णांना आजअखेर घरी सोडण्यात आले आहे. तसेच १९५०४२ रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Web Title: Corona virus : 50,000 patients of pimpri chinchwad city Corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.