शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

Corona virus : पिंपरी- चिंचवड शहरात मंगळवारी ३४ नवीन कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या ५५९ वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 9:42 PM

पुण्याच्या तुलनेत पिंपरी- चिंचवड शहरात कोरोनाचा वेग कमी

ठळक मुद्देसक्रिय रूग्णांची संख्या २३२ असून आजपर्यंत २८२ जण कोरोनामुक्त

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून मंगळवारी एकाच दिवसात शहरात पुण्यातील दहा आणि पिंपरी-चिंचवडमधील २४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या ५५९ वर पोहोचली आहे.पुण्याच्या तुलनेत पिंपरी- चिंचवड शहरात कोरोनाचा वेग कमी आहे. हौसिंग सोसायट्या, मध्यमवर्गीय भागासह झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाच्या पाचव्या टप्यात शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.गेल्या दोन दिवसांत कोरोनाचा वेग कमी होता तो पुन्हा वाढला आहे. एकाच दिवसात शहरात पुण्यातील दहा आणि पिंपरी-चिंचवडमधील २४ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.  त्यात पिंपरी-चिंचवडमधील १३ पुरूष आणि ११ महिलांचा तर पुण्यातील सात पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये इंदिरानगर, वाकड, पिंपळेसौदागर, काळेवाडी, भोसरी, दापोडी, पिंपरी, किवळे, सांगवी, अजंठानगर तर पुण्यातील कसबा पेठ, आंबेगाव, दौंड, खडकी, देहूरोड येथील नागरिकांचा समावेश आहे. तर चिंचवड आनंदनगर, भोसरी येथील  सात जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर मृत्यू झालेल्यांमध्ये वाल्हेकरवाडी, दापोडी, मंगळवार पेठ पुणे, दौंड येथील नागरिकांचा समावेश आहे. तीन महिन्यात एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू होण्याची आज पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मृतांची संख्या २४ वर गेली आहे. महापालिका रूग्णालयात आज साठ जणांना दाखल करण्यात आले असून १५२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या रूग्णालयात ४१३ जण दाखल केले आहेत. तर १४ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर सक्रिय रूग्णांची संख्या २३२ असून आजपर्यंत २८२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरDeathमृत्यू