Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी ३१ नवीन कोरोनाबधित रुग्णांची नोंद, देहूरोड येथील वृद्धाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 20:30 IST2020-06-03T20:29:32+5:302020-06-03T20:30:13+5:30
पिंपरीतील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५८४ वर पोहचली..

Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी ३१ नवीन कोरोनाबधित रुग्णांची नोंद, देहूरोड येथील वृद्धाचा मृत्यू
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून दिवसभरात ३१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर देहूरोड येथील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ५८४ वर गेली आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून शहरात आज दिवसभरात एकूण ३१ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये २५ पुरूष तर १० महिला आणि पुण्यातील ४ पुरूष, २ महिलांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर, वाकड, दापोडी, रामनगर, चिंचवड, पिंपरी, अजंठानगर, किवळे, पिंपळे सौदागर, मोरवाडी, पिंपळे गुरव, खडकी, आंबेगाव, कसबा पेठ, बालेवाडी येथील नागरिकांचा समावेश आहे.
महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज १०३ जणांना दाखल केले आहे. तर एनआयव्हीकडे पाठविलेल्या २६ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच १८९ जणांचे अहवाल प्रलंबित असून, सध्या रुग्णालयामध्ये २८५ जण दाखल आहेत. तर दिवसभरामध्ये ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरामध्ये २६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३१९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
त्याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये वाकड, चिंचवड, फुगेवाडी, रहाटणी, पिंपळे सौगदार, रावेत, वाल्हेकरवाडी, आनंदनगर, ताथवडे आणि बीड येथील नागरिकांचा समावेश आहे.
कोरोनामुळे देहूरोड येथील ७० वर्षीय व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. या व्यक्तीस पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.