Corona virus: 172 corona viruses infected in Pimpri positive patients; 178 became better | Corona virus : पिंपरीत पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा १७२ कोरोनाबाधित ; १७८ झाले ठणठणीत बरे

Corona virus : पिंपरीत पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा १७२ कोरोनाबाधित ; १७८ झाले ठणठणीत बरे

पिंपरी : दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या वाढू लागली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात १७८ कोरोनामुक्त झाले आहे. तर पॉझिटिव्ह रुग्ण १७२ आढळले आहेत.
 
दिवाळीत खरेदीसाठी मोठ्याप्रमाणावर नागरीक घराबाहेर पडल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली होती. अडीचशेच्या वर गेलेली संख्या कमी होऊ लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात २ हजार ३९१ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी २ हजार ११० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ८७० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात २ हजार ४०० जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या १०२९ वर पोहोचली आहे.
..............................
कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी
शहरात रुग्ण संख्या तिपटीने वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही घटत असल्याचे दिसून येत आहे. शहर परिसरातील १७८ जण कोरोनामुक्त झाले असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८८ हजार ३५७ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९२ हजार ३३१ वर पोहोचली आहे.
..........
बळीची संख्या झाली कमी
  पिंपरी-चिंचवडमधील १ आणि शहराबाहेरील १ अशा २ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एक महिला, शहराबाहेरील एक पुरूषाचा समावेश आहे. मृतांमध्ये दापोडी येथील ६१ वर्षीय, हिंजवडीतील ५० वर्षीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत मृतांमध्ये पुरूष, साठ वर्षांवरील ज्येष्ठांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत आहे.  तर कोरोनामुळे मृत होणाºयांची संख्या १ हजार ६२९ वर पोहोचली आहे.

Web Title: Corona virus: 172 corona viruses infected in Pimpri positive patients; 178 became better

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.