वाल्मिक कराडची पुण्यात कोट्यवधींची संपत्ती! अजित पवार म्हणाले, ‘वेगवेगळे लोक….’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:01 IST2025-01-18T09:00:16+5:302025-01-18T09:01:10+5:30
कराडप्रकरणी वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात. ती माहिती दिल्यानंतर सीआयडी, एसआयटी दखल घेऊन चौकशी करतील.

वाल्मिक कराडची पुण्यात कोट्यवधींची संपत्ती! अजित पवार म्हणाले, ‘वेगवेगळे लोक….’
पिंपरी :वाल्मीक कराडप्रकरणी सीआयडी आणि एसआयटीने कोणाच्याही दबावात येऊ नये. निष्पक्षपाती चौकशी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. मीडियाने चुकीच्या बातम्या चालवल्या, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी (दि. १७) पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.पवार म्हणाले की, वाल्मीक कराडप्रकरणी वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात. ती माहिती दिल्यानंतर सीआयडी, एसआयटी दखल घेऊन चौकशी करतील.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला. त्यानंतर मुंबईत कायदा-सुव्यवस्था ढासळली, अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी माहिती न घेता चालवल्या. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था चांगलीच राहावी, हा आमचा प्रयत्न असतो. पोलिसांनी तपास केल्यानंतर ती व्यक्ती सापडली आहे. हल्लेखोर घरात कसा गेला, नेमका चोरीच्या उद्देशाने गेला की त्यांच्यातीलच कोणी यात सहभागी होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.