अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी पत्नीची पतीविरोधात फिर्याद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 16:31 IST2019-01-21T16:25:02+5:302019-01-21T16:31:18+5:30
पतीने पत्नीला अश्लील एसएमएस पाठविला. यामुळे संतापलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी पत्नीची पतीविरोधात फिर्याद
पिंपरी : पतीने पत्नीला अश्लील एसएमएस पाठविला. यामुळे संतापलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ही घटना पिंपरी येथे घडली.
याबाबत ३५ वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी नाशिक येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ३० डिसेंबरला दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास पतीने पत्नीला अश्लील एसएमएस पाठवत तिच्या मनात लज्जा उत्पन्न केली. तिचा विनयभंग केला. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.