माझ्याकडे पण वर्दी आहे म्हणत महिला पोलिसाची पकडली कॉलर, फुगेवाडी चौकातील घटना
By रोशन मोरे | Updated: April 4, 2023 17:22 IST2023-04-04T17:19:56+5:302023-04-04T17:22:15+5:30
या प्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली...

माझ्याकडे पण वर्दी आहे म्हणत महिला पोलिसाची पकडली कॉलर, फुगेवाडी चौकातील घटना
पिंपरी : महिला पोलिस कर्मचारी यांनी नो एंट्रीतून येणाऱ्या दुचाकीचालकाला अडवले असता त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून ढकलून दिले. तसेच त्यांना मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.२) फुगेवाडी चौक येथे रात्री पावनेनऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संगीता शांताराम कदम (वय २७. रा. पिंपळे गुरव) यांना अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्राफिक पोलीस अशून वाहतूक नियमन त्या करत होत्या. तेंव्हा फुगेवाडी चौकात नो एंट्रीतून त्यांना एक दुचाकी येताना दिसली. त्यांनी त्या दुचाकीला थांबवले असता दुचाकीच्या मागे बसलेल्या तरुणीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच माझ्याकडे पण वर्दी आहे तुला काय करायचे ते कर असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करत त्यांची ड्रेसची कॉलर पकडून ढकलून दिले. त्यामुळे फिर्यादी यांना उजव्या पायाला दुखापत झाली, असे फिर्यादीत नमूद आहे.