शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

पिंपरी महापालिकेच्या वतीने स्मशानभूमीत " कोल्ड स्टोअरेज " बांधण्याचा प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 7:43 PM

काळेवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या स्मशानभूमीत कोल्ड स्टोअरेज बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणल्याचे उघड

ठळक मुद्देया प्रस्तावाचा पोलखोल केल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की रुग्णालय आणि डेड हाऊसमध्ये मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेजची सुविधा

पिंपरी : महापालिकेच्या वतीने विविध प्रकल्पांवर लूट सुरू आहे. अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जात आहे. महापालिकेच्या वतीने काळेवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या स्मशानभूमीत कोल्ड स्टोअरेज बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणल्याचे उघड झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांनी या प्रस्तावाचा पोलखोल केल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने काळेवाडी, लिंक रोड येथील त्रिलोक स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. स्मशानभूमी बांधण्याबरोबच त्यात कोल्ड स्टोअरेजची सुविधा बांधण्यात येणार आहे.  हे काम ९.९९ टक्के कमी दराने निविदा भरणाºया अंबिका कॅन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यास प्रशासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यासाठी एकूण ३ कोटी ७४ लाख खर्च अपेक्षित धरला आहे. स्थायी समोर सादर केलेल्या याविषयात स्मशानभूमीत कोल्ड स्टोअरेज उभारण्याचा उल्लेख नव्हता. ही बाब सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर सदस्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.मात्र, स्मशानभूमीवर एवढा खर्च कसा काय? या खर्चाच्या विषयाचा खुलासा करताना स्मशानभूमी नूतनीकरणाच्या कामात कोल्ड स्टोअरेजची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे खर्च वाढला आहे, असे अधिकाºयांनी सांगताच सर्व सदस्यांनी जोरदार टीका केली. त्यावेळी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी प्रशासनास धारेवर धरले.सदस्यही आक्रमकस्मशानभूमीत कोल्ड स्टोअरेज उभारण्याचा विषय सदस्यांच्या निदर्शनास आल्यानंतर सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. सभेसमोर विषय पत्र सादर करताना प्रशासनाने त्यात परिपूर्ण माहिती देण्याची गरज आहे. माहिती लपविल्यास शंकेस वाव मिळतो आणि नाहक टीकेलाही बळी पडावे लागते. त्यामुळे प्रशासनाने पूर्ण माहिती असणारे विषय पत्रिकेवर आणण्याची गरज आहे.विलास मडिगेरी म्हणाले, रुग्णालय आणि डेड हाऊसमध्ये मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेजची सुविधा असते. स्मशानभूमीत अशी सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. तसेच विषय पत्रात काम कोणत्या प्रकारे होणार त्यातील घटक याविषयी प्रशासनाने उल्लेख करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या कामातून कोल्ड स्टोअरेज उभारण्याचे काम वगळण्याची गरज आहे. कोल्ड स्टोअरेजची सुविधा वगळून हा प्रस्ताव फेरसादर करावा.ह्णह्ण त्यानंतर प्रशासनाने स्मशानभूमीचा विषय मागे घेतला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकर