Pimpri Chinchwad: फटाके फोडल्यावरून दोन कुुटुंबांंमध्ये हाणामारी, चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 13:24 IST2023-12-02T13:24:12+5:302023-12-02T13:24:37+5:30

दापोडी येथील वीट भट्टी येथे बुधवारी (दि. २९) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला...

Clash between two families over bursting firecrackers, four booked pune latest news | Pimpri Chinchwad: फटाके फोडल्यावरून दोन कुुटुंबांंमध्ये हाणामारी, चौघांवर गुन्हा

Pimpri Chinchwad: फटाके फोडल्यावरून दोन कुुटुंबांंमध्ये हाणामारी, चौघांवर गुन्हा

पिंपरी : फटाके वाजविल्यावरून दोन कुटुंबांमध्ये भांडण झाले. त्याचा राग मनात धरून पती-पत्नी व दोन मुलींना मारहाण करत जखमी केले. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दापोडी येथील वीट भट्टी येथे बुधवारी (दि. २९) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

हरीसिंग लच्छी पांचाळ (४३, रा, दापोडी) यांनी या प्रकरणी गुरूवारी (दि. ३०) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अजय शिंदे (३२), आनंद गायकवाड (३८), अशोक साळवी (७०) यांच्यासह एका महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांचाळ व संशयितांमध्ये फटाके वाजविल्यावरून भांडण झाले होते. याचा राग मनात धरून चौघांनी शिवीगाळ केली. त्यामुळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, फिर्यादी व त्यांच्या पत्नीला हाताने मारहाण केली. यावेळी फिर्यादी पांचाळ यांच्या मुली मध्ये आल्या असता, डोक्यात वीट मारून मुलीला जखमी केले. यावेळी फिर्यादी पांचाळ व त्यांच्या कुटुंबीयांना चौघांनी शिवीगाळ केली. ‘आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही. एकेकाला मारून टाकू,’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Clash between two families over bursting firecrackers, four booked pune latest news