पिंपरी- चिंचवड शहरातील लेबर कॅम्पमधील नागरिक, मुलांची सुरक्षितता महत्वाची : महापौर राहुल जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 01:46 PM2019-07-26T13:46:11+5:302019-07-26T13:52:36+5:30

पिंपळे सौदागर येथील एका बांधकाम साईटवर असलेल्या लेबर कॅम्पमधून अडीच वर्षाच्या मुलीचा अत्याचार करून खून करण्यात आला.

childrens and citizens of pimpri - Chinchwad Labor camps safety is very important : Mayor Rahul Jadhav | पिंपरी- चिंचवड शहरातील लेबर कॅम्पमधील नागरिक, मुलांची सुरक्षितता महत्वाची : महापौर राहुल जाधव

पिंपरी- चिंचवड शहरातील लेबर कॅम्पमधील नागरिक, मुलांची सुरक्षितता महत्वाची : महापौर राहुल जाधव

Next
ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश 

पिंपरी : पिंपळे सौदागर येथे मुलीवर झालेल्या अत्याचार घटनेचे पडसाद आजच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. शहर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पोलीस आयुक्तांना भेटून सुरक्षेच्या उपाययोजनाची मागणी करावी, अशी मागणी सर्वपक्षीयांनी केली. त्यावर चिंचवड शहरातील लेबर कॅम्पमधील नागरिकांची, त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी  प्रकल्पांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे. त्यांना तसे बंधनकारक करण्यात यावे, असा आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिला. 
महापालिकेची सर्वसाधारण झाली. पिंपळे सौदागर येथील एका बांधकाम साईटवर असलेल्या लेबर कॅम्पमधून अडीच वर्षाच्या मुलीचा खून करण्यात आला. या घटनेचे पडसाद आज सर्वसाधारण सभेत उमटले. 
राष्ट्रवादीच्या नगरसेविका  मंगला कदम म्हणाल्या, शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुली, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना अतिशय दुदेर्वी आहे. नराधमांवर कडक कारवाई करण्यात यावी. शहरात  सीसीटीव्ही' कॅमेरे बसवावेत.ह्णह्ण
भाजपच्या नगरसेविका झामाबाई बारणे म्हणाल्या, बलात्कार, विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात.ह्णह्ण
शीतल काटे म्हणाल्या, स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित होत असलेल्या पिंपळेगुरवमध्ये मुली, महिला सुरक्षित नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात सर्वत्र 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसवावेत.ह्णह्ण
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ह्यह्यदोन वर्षाच्या चिमुरडीवर झालेली बलात्काराची घटना अत्यंत दुदेर्वी आहे. विकृती संपविणे गरजेचे आहे. कायदा सुव्यस्था अबाधित राहिली पाहिजे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्यात येत आहेत. उर्वरित ठिकाणी देखील कॅमेरे बसविण्यात यावेत.ह्णह्ण 
महापौर राहुल जाधव म्हणाले, ह्यह्यकायदा-सुव्यवस्था चांगली रहावी, याबात पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केली जाणार आहे. सीसीटीव्ही बसविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. त्यानुसार शहरात सर्वत्र कॅमेरे बसविले जातील. बांधकाम प्रकल्पांवर नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्पांच्या कामाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात यावेत.ह्णह्ण

Web Title: childrens and citizens of pimpri - Chinchwad Labor camps safety is very important : Mayor Rahul Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.