अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न ; आराेपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 15:28 IST2019-08-11T15:27:23+5:302019-08-11T15:28:55+5:30
खाऊचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आराेपीला पाेलिसांनी अटक केली आहे.

अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न ; आराेपी अटकेत
पिंपरी : खाऊचे आमिष दाखवून घरात घेऊन जाऊन अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. भोसरीतील इंद्राणीनगर येथे शुक्रवारी (दि. ९) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ननकु श्रीविलास सिंह (वय २०, रा. इंद्रायणीनगर, भोसरी, मूळ रा. सुजानपूर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अडीच वर्षीय मुलीच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिंह अडीच वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखविले. तुला खायला देतो, असे सांगून घरात घेऊन गेला. त्यानंतर मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सिंह याला अटक केली. अॅट्रॉसिटी, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत आरोपी सिंह याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.