Pimpri Chinchwad Crime | चऱ्होलीत मध्यरात्री पाठलाग करत गोळीबार; दोन जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 14:07 IST2023-03-20T14:05:31+5:302023-03-20T14:07:29+5:30
जुन्या भांडणाच्या कारणातून आरोपी हरिओम आणि त्याचा साथीदार यांनी दुचाकीवरून फिर्यादीचा पाठलाग केला...

Pimpri Chinchwad Crime | चऱ्होलीत मध्यरात्री पाठलाग करत गोळीबार; दोन जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून पाठलाग करत एकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि.१८) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चऱ्होलीतील चोवीसावाडी येथील बीआरटी काटे कॉलनी बस स्टॉपजवळ घडली. याप्रकरणी सिद्धेश सीताराम गोवेकर (वय २८, रा. वडमुखवाडी,चऱ्होली) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी हरिओम पांचाळ (वय २०, रा. आळंदी देवाची, ता.खेड) याच्यासह त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुचाकीवरून वडमुख वाडी येथे घरी जात होते. तेव्हा बीआरटी काटे कॉलनी बसस्टॉप जवळ जुन्या भांडणाच्या कारणातून आरोपी हरिओम आणि त्याचा साथीदार यांनी दुचाकीवरून फिर्यादीचा पाठलाग केला. हरिओम याने त्याच्या जवळची बंदूक फिर्यादीच्या दिशेने रोखून दोन गोळ्या झाडल्या. आरोपीचा निशाना चुकल्याने फिर्यादीचा जीव वाचला.