शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

‘सारथी’ असून खोळंबा

By admin | Updated: October 19, 2015 01:50 IST

नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी, तसेच महापालिकेशी संबंधित विविध विभागांच्या सुविधेबाबत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या

मंगेश पांडे, पिंपरीनागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी, तसेच महापालिकेशी संबंधित विविध विभागांच्या सुविधेबाबत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सारथी’ हेल्पलाइन प्रकल्पाची स्थिती सध्या असून नसल्यासारखी झाली आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या सारथी हेल्पलाइनवर सुरुवातीला दिवसभरात सुमारे चारशे कॉल येत होते. त्यांच्या बदलीनंतर तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे कॉल येण्याचे प्रमाण चारशेहून अडीचशेवर आले आहे. अशातच आयुक्त राजीव जाधव यांनी ही सुविधा १ जानेवारीपासून चोवीस तास सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यातून तरी व्यवस्थित सेवा मिळणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ‘सिस्टिम आॅफ असिस्टिंग रेसिडेन्टस अँड टुरिझम थ्रो हेल्पलाइन इन्फॉर्मेशन’ (सारथी) ही हेल्पलाइन १५ आॅगस्ट २०१३ ला सुरू झाली. यातून ४५ प्रकारच्या सुविधांची माहिती दिली जाते. यामध्ये ३२ सुविधा महापालिकेशी संबंधित आहेत. तर ११ केंद्र व राज्य शासनाशी, तर दोन खासगी क्षेत्राशी संबंधित आहे. या सुविधेमुळे प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन माहिती घेण्यासाठी जाणाऱ्या वेळेची बचत होईल, असा उद्देश होता. डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांची खूप मोठी सोय झाली. माहिती घेण्यासह ठिकठिकाणच्या तक्रारीदेखील या हेल्पलाइनमार्फत अधिकाऱ्यांपर्यंत पोहचू लागल्या. एक कॉल केला, तरी समस्यांचे निराकरण होत होते. सुरुवातीला दिवसाला सुमारे चारशे कॉल येत होते. डॉ. परदेशी यांच्या बदलीनंतर ‘सारथी’वर करण्यात येणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची तक्रार आहे. अशातच सकाळी सात ते रात्री दहा या वेळेत सुरू असणारी ही सुविधा आता चोवीस तास सुरू ठेवणार असल्याची घोषणा आयुक्त राजीव जाधव यांनी केली आहे. ‘सारथी हेल्पलाइन’बाबत नगरसेवकही नाराजप्रभागात कुठलीही समस्या निर्माण झाली की, त्याची सोडवणूक करण्यासाठी नगरसेवकांच्या घरचे उंबरे झिजवावे लागायचे. यामुळे नागरिक व नगरसेवकांचा संपर्क यायचा. मात्र, नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सारथी’ हेल्पलाइन कॉल केल्यास तातडीने प्रश्न सुटत होते. त्यामुळे नागरिकांचे नगरसेवकांकडे जाण्याचे प्रमाणही कमी झाले. मतदार दूर जाऊ लागला होता. यामुळे नगरसेवकांनी ‘सारथी’बाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, डॉ. परदेशी यांची बदली झाल्यानंतर सारथीवर तक्रार केली, तरी त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.