ऑनलाइन मटका खेळणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल; १६ हजारांचे जुगारी साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:51 IST2021-07-01T11:51:48+5:302021-07-01T11:51:53+5:30

देहू फाटा, आळंदी येथील घटना

Charges filed against four people for playing Matka online; 16,000 gambling materials seized | ऑनलाइन मटका खेळणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल; १६ हजारांचे जुगारी साहित्य जप्त

ऑनलाइन मटका खेळणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल; १६ हजारांचे जुगारी साहित्य जप्त

ठळक मुद्दे मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण १६ हजार ६०० रुपयांचे जुगाराचे साहित्य

पिंपरी: ऑनलाइन मटका खेळणाऱ्या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मोबाईल फोन व रोख रक्कम जप्त केली आहे. देहू फाटा, आळंदी येथे बुधवारी (दि. ३०) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

इनायत अजिज शेख (वय ३६, रा. संत तुकाराम नगर, भोसरी), हसन शेख, माऊली जगताप (दोघेही रा. देहू फाटा), बाळासाहेब तापकीर (रा. वडमुखवाडी, चऱ्होली), अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस नाईक हेमंत महादेव आव्हाड यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मोबाईल फोनवर ऑनलाइन व्हाट्सअप द्वारे घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण १६ हजार ६०० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले.

 

Web Title: Charges filed against four people for playing Matka online; 16,000 gambling materials seized