chain snatching at Pimpri, woman who was walking on road | पायी जात असलेल्या महिलेचे गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकवले
पायी जात असलेल्या महिलेचे गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकवले

पिंपरी : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकी वाहनांवरून येऊन दोन चोरट्यांनी  हिसकावले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी सहा वाजता दिघी रोड, भोसरी येथे घडली.
 याप्रकरणी संगीता शेखर म्हस्करे (वय ५०, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिपक परशुराम माळी (वय २१) व प्रविण कछवा ( दोघे रा. केशवनगर, मुंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिपक माळी याला अटक केली आहे.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्या नणंद भारती म्हस्करे या सायंकाळच्या वेळी रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी लाल रंगाच्या दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी भारती यांच्या गळ्याला कशाच्या तरी साह्याने जखमी करून पावनेदोन तोळे सोन्याचे ६० हजार रुपये किमतीचे गंठण चोरून नेले. यातील एका आरोपीला अटक केली असून भोसरी पोलीस तपास करत आहेत.


Web Title: chain snatching at Pimpri, woman who was walking on road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.