लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या जंक्शन बॉक्समधील बॅटऱ्या कामगारानेच चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चोरी करणाऱ्या कामगाराला अटक केली आहे. अब्दुल अजीज इस्माईल शेख (वय ५०, रा. काळभोरनगर, आकुर्डी) असे त्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष हावळे (वय ३१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हे पुण्यातील स्वारगेट परिसातील अलाईड डिजिटल सर्व्हिसेस कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांच्याकडे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सोपविले आहे. या कंपनीला महाराष्ट्र शासनाकडून अर्थपुरवठा केला जातो.
सीसीटीव्ही कॅमेरे, बॅटरी चोर अटकेत
By admin | Updated: June 28, 2017 04:14 IST