फुगेवाडीमध्ये भीषण अपघातात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 13:30 IST2021-10-30T13:24:42+5:302021-10-30T13:30:26+5:30

पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. फुगेवाडी येथे शुक्रवारी ...

car two wheeler collision death of girl accident fugewadi | फुगेवाडीमध्ये भीषण अपघातात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

फुगेवाडीमध्ये भीषण अपघातात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. फुगेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. राजेश हिरालाल यादव (वय ३४, रा. पवनानगर, काळेवाडी) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. २९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शशी शंकर राजू (वय ४५, रा. मीरारोड, मुंबई) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण संजू मनोज यादव, दाजी मनोज यादव व त्यांची सहा वर्षीय मुलगी दुचाकीवरून चालले होते. ते फुगेवाडी येथे आले असता त्यांच्या दुचाकीस आरोपी शशी यांच्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. त्यानंतर आणखी एका दुचाकीस धडक दिली. फिर्यादीची बहीण संजू, दाजी मनोज आणि अन्य एका दुचाकीवरील सुरेंद्रकुमार पूर्णनंदा सारंगी हे तिघेजण गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादीच्या सहा वर्षीय भाचीचा या अपघातात मृत्यू झाला.

Web Title: car two wheeler collision death of girl accident fugewadi