कठड्याला धडकून कार पडली नदीत ; वडगाव मावळ येथील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 16:49 IST2019-08-01T16:49:08+5:302019-08-01T16:49:52+5:30
पुलावरील कठड्याला धडकून कार पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना वडगाव मावळ येथे घडली आहे.

कठड्याला धडकून कार पडली नदीत ; वडगाव मावळ येथील धक्कादायक घटना
वडगाव मावळ : भरधाव कार पूलाचा कठडा ताेडून इंद्रायणी नदीत पडल्याची धक्कादायक घटना वडगाव मावळ भागात घडली आहे. या कारमधील एक युवक पाेहत पुलाजवळ आला असून नागरिकांनी त्याला बाहेर काढले. कारमधील इतर दाेन युवकांचा शाेध घेण्यात येत आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली.
एका कारमधून तीन युवक टाकवेकडे जात असताना येथील इंद्रायणी नदीवरील पुलावरील खड्डे आणि खडीवरुन घसरुन कार पुलाच्या कठड्याला धडकून नदीत पडली. कारमधील युवक संजय ढगे (वय 20) हा पाण्यातून पाेहत पुलाजवळ आला. त्याला नागरिकांनी दाेरीच्या सहाय्याने बाहेर काढले. तर त्याचे इतर साथिदार अक्षय मनाेहर जगताप ( वय 20) व संकेत नंदू जगताप (वय20 ) हे कारसाेबत वाहत गेले असून इंद्रायणी नदीत त्यांचा शाेध एनडीआरएफचे जवान घेत आहेत.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कारने तीघेजन टाकवे कडे जात असताना पुलावर मोठमोठे खड्डे झाले असून संपूर्ण खडी रस्तावर पसरली आहे. ब्रेक मारल्यानंतर कार घसरत पुलाला धडकून पाण्यात पडली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर व त्यांची टीम दाखल झाली आहे.